ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ह्युमन राईट असोसिएशन कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष भिवा नाईक यांची पुनर्नियुक्ती…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ह्युमन राईट असोसिएशन कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष भिवा नाईक यांची पुनर्नियुक्ती…!

प्रकाशन: 16 Jan 2023 01:36 PM
वाचन संख्या 67

विवेक परब | ब्युरो चीफ : पुणे येथील आकुर्डीतल्या जयगणेश व्हिजन मधील ह्युमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या प्रमुख कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात कोकण विभागीय अध्यक्ष श्री. संतोष नाईक यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
या पुनर्नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे यांच्या हस्ते तर राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांचे हस्ते देण्यात आले.

तसेच रत्नागिरी जिल्हा संघटक म्हणून फेरनिवड श्री.विकास पेजे,व रत्नागिरी जिल्हा सचिव म्हणून श्री.सागर कळबंटे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. त्यावेळी उपस्थित राष्ट्रीय पदाधिकारी श्री.नवघनं, श्री.रामदास खोत, राज्य उपाध्यक्ष दवणे, राज्य सचिव श्री. राकेश शिंदे, राज्य निरीक्षक श्री.घन:शाम सांडीम, रत्नागिरी जिल्हा संघटक श्री. विकास पेजे, श्री.सागर कळंबटे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मनोज तोरसकर, उपस्थित होते. १२ जानेवारीला हा कार्यक्रम संपन्न झाला.

संघटनेचे कार्य व उदिष्ट याविषयी सविस्तर मार्गदर्शन मा.प्रमोद केसरकर यांनी केले व नंतर संघटना वाढीबद्दल चर्चा झाली. यानंतर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शेरे यांचे तर्फे सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राकेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. घन:शाम सांडीम यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स