पळसंब गावच्या श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थयात्रेची घोषणा..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील श्री.जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थयात्रेची घोषणा झाली आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२३ ला श्री. क्षेत्र कुणकेश्वर तीर्थयात्रेसाठी पायी दिंडी स्वरुपात जायचे असल्याचीही माहिती देवस्थान मानकरी, देवस्थान ट्रस्ट, तसेच गावातील रहिवाशी, महिला मंडळाच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे.
गावातील सर्व तसेच मुंबईकर चाकरमानी व बाहेरगावी असलेल्या सर्व रहिवाशी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही सात्विक आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना वस्तुरूप किंवा रोख रक्कम स्वरुपात देणगी द्यायची असेल त्यांनी देवस्थान कमिटीशी संपर्क साधावा तसेच प्रत्येक कुटुंबाला २५० /- रुपये पट्टी बसवण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वस्तू रुप देणगीसाठी देवस्थानचे खजिनदार श्री. चंद्रकात गोलतकर यांच्याशी ९४२२२३३४८९ /९४२१७५५८७१ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
( सर्व छायाचित्रे पूर्वीच्या दिंडितील संग्राहीत आहेत.)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)