ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर गांवचे सुपुत्र नंदकुमार तावडे तथा 'घाडी मास्तर' यांना क्रीडा क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर गांवचे सुपुत्र नंदकुमार तावडे तथा 'घाडी मास्तर' यांना क्रीडा क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 15 Jan 2023 10:36 PM
वाचन संख्या 155

विवेक परब | ब्यूरो चीफ : रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी नंदकुमार तावडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नंदकुमार तावडे (घाडी मास्तर) हे क्रीडा क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. आयुष्यातील ६० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी क्रीडा क्षेत्राची निरपेक्ष आणि निःस्वार्थपणे सेवा करण्यात व्यतित केला आहे.

चिंदर गावचे सुपुत्र नंदकुमार तावडे हे ‘घाडी मास्तर’ म्हणून क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध असून प्रथम बृहन्मुंबई हौशी संघटनेत १९७४ पासून व नंतर १९८२ साली पॉवरलिफ्टिंग संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून आजतागायत ते मानद महासचिव पद सांभाळत आहेत. कामगार विभागातील करी रोड रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या श्री शिव छत्रपती व्यायाम शाळेत ते १९८६ पासून व्यायाम शिक्षक म्हणून आजपर्यंत काम पहात आहेत. त्यांनी २०००च्या वर युवकांना मार्गदर्शन केले. त्यात काही खेळाडू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स