ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव उत्साहात संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 15 Jan 2023 10:06 PM
वाचन संख्या 37

पाच दिवस विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम.

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील स्वयंभू श्री  शांतादुर्गा देवी  जत्रोत्सव  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त पाच दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जत्रोत्सवानिमित मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून गेला होता.
६ जानेवारीला कलशारोहण वर्धापन दिन सोहळा आणि महाप्रसाद, मोफत औषधांसह सर्वसाधारण आरोग्य शिबीर , श्री देवी भराड़ी प्रासादिक भजन मंडळ, मसदे, पूजापाठ व पालखी सोहळा रात्री ११ वाजता (लोकजागर) आईचा गोंधळ कार्यक्रम झाला.

०७ जानेवारीला सकाळी कृषी प्रदर्शन माहितीविषयक (महाराष्ट्र शासन), शालेय विद्यार्थ्याचा गुणगौरव- समता मंडळ आयोजन.स्नेह मेळावा (हळदी-कुंकूसहित) – विविध स्पर्धा.सायं. नवपाटवाडी ग्रामविकास प्रासादिक भजन मंडळ, रात्री तालुकास्तरीय नृत्यस्पर्धा.  ०८ जानेवारीला श्रीदुर्गासप्तशती महायज्ञ / महाप्रसाद, रक्तदान शिबीर (महाराष्ट्र शासन),आरोग्य शिबीर- एसएसपीएम मेडिकल
कॉलेज आणि लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे., श्री पूर्णानंद स्वामी प्रासादिक भजन मंडळ, गोळवण-बोरकरवाडी यांचे भजन, समज प्रबोधनपर कीर्तन – ह.भ.प. गावडे महाराज-सिंधुदुर्ग, रात्रौ पूजापाठ व पालखी सोहळा, चेंदवणकर-गोरे दशावतारी मंडळनिर्मित नाटयप्रयोग. ९ जानेवारीला संगीत भजन स्पर्धा.१० जानेवारीला
कोकुलो कॅमलीन पुरस्कृत शैक्षणिक उपक्रम / स्पर्धा,सायं. दिपोत्सव व समता प्रासादिक भजन मंडळ वडाचापाट-थळकरवाडी हरीनाम संकीर्तन- श्रीमद्भागवत कथाव्यास – श्री रामचंद्र दास (इस्कॉन)(प.पू.श्री. राधागोविंद गोस्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य), रात्री बक्षीस वितरण. व त्यानंतर पूजापाठ पालखी सोहळा झाला. पालखी सोहळ्यास भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. पाच दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स