ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अवकाश कुतुहलातून आठवडाभर 'तारे जमीन पर..!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अवकाश कुतुहलातून आठवडाभर 'तारे जमीन पर..!'

प्रकाशन: 13 Jan 2023 11:06 AM
वाचन संख्या 381

सुयोग पंडित | मुख्य संपादक : एक आठवडा तारे जमीनपर अनुभवणे नुकतेच देवगड तालुक्यात शक्य झाले. निमित्त ठरले रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘कुतूहल अवकाशाचे- सत्र तिसरे’ या आकाश दर्शनाचा कार्यक्रमाचे..!

३ ते ९ जानेवारी २०२३ हे ७ दिवस आरे, खुडी, वळीवंडे, कोटकामते, तोरसोळे आणि कुणकेश्वर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांना एकूण ३७२ विद्यार्थ्यांनी तसेच ३३ शिक्षकांनी सहभाग घेऊन टेलीस्कोपच्या माध्यमातून शनि, गुरु, मंगळ आणि चंद्र या खगोलीय घटकांचे निरीक्षण केले. त्याच बरोबर अनेक तारे, तारकासमूह, नक्षत्रे, राशी, उपग्रह, दीर्घिका, कृत्रिम उपग्रह यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली.


या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून श्री. मंदार गजानन माईणकर रा. मालवण ( संपर्क क्रमांक: ९४२१८८१०३१) यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. मंदार यांनी भारतीय, ग्रीक तसेच रोमन पौराणिक कथा सांगून या कथांचा वापर अवकाश समजून घेताना कसा करावा, याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमांमध्ये जनकल्याण समितीचे कोकण संभाग प्रयोगशाळा विषयप्रमुख श्री. हेमंतजी आईर, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यवाह श्री.जयेशजी खाडिलकर, सहकार्यवाह श्री.विवेक कुलकर्णी, शिक्षण आयाम प्रमुख श्री. जगदीश गोगटे, प्रकल्प प्रमुख श्री.चेतन पुजारे, सहप्रमुख श्रीम. प्रतीक्षा जाधव, प्रकल्प समितीचे पालक श्री. आनंद राजम, प्रकल्प समिती सदस्य श्री. धर्मराज धुरत, प्रकल्प शिक्षक श्री. भगिरथ राणे तसेच अनेक पालक, उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स