कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली शाळा क्र.३ चे सुयश ; विद्यार्थ्यांचे वाहन सुरक्षा संशोधन ठरला कौतुकाचा विषय.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ‘नाटळ हायस्कूल’ येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक तीन च्या कु संतोषी सुशांत साळवे व कु भालचंद्र रवींद्र सावंत यांनी विद्यार्थी प्रतिकृती मध्ये इयत्ता सहावी ते आठवी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे
त्यांनी ड्रायव्हरचा स्मार्ट सोबती ही प्रतिकृती तयार केली होती या विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी ड्रायव्हरला झोप आल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी इन्फ्रारेड सेन्सर चा वापर करून गॉगल बनवला व त्याचे कनेक्शन गाडीच्या ब्रेक ला व बझरला दिले त्यामुळे ड्रायव्हरने तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ डोळे मिटले तर आपोआप गाडीला ब्रेक लागतात व बझर वाचतो व होणारा अपघात टाळू शकतो त्यांना या प्रतिकृतीसाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा करंबेळकर व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविंद्र सावंत यांनी अभिनंदन केले आहे .पालक वर्गातून या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)