शिडवणे क्र.१ शाळेचे वनभोजन सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ 'नाधवडे उमाळा' येथे संपन्न.
पदाधिकारी आणि अधिकारी यांचाही उत्स्फूर्त सहभाग
विवेक परब | ब्यूरो चीफ : शालेय जीवनात व खासकरुन प्राथमीक शाळेत ‘वनभोजन’ ही मोठी पर्वणीच असते. दरवर्षी शाळेच्या वतीने वनभोजन घेण्यात येते. एक दिवस वनात म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन भोजनाचा आनंद घेत तृप्तीचा ढेकर देताना मिळणारा आनंद विरळाच. हा आनंद देणाऱ्या शिडवणे क्र.१ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे, पालकांचे आणि शिक्षकांचे उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
या वर्षी शिडवणे क्र.. १ शाळेने ‘नाधवडे उमाळा’ या प्रसिद्ध पर्यटनस्थळी वनभोजन उपक्रमाचे आयोजन केले होते.
वनभोजन उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, ग्रामपंचायत आणि तालुका, जिल्हा पदाधिकारी, अधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. गावातील बहुसंख्य पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने होत असलेले वनभोजन पाहून उपस्थित पदाधिकारी आणि अधिकारी यांनी सर्वांचे मुक्तकंठाने कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या भेंड्या, दोरी उड्या, क्रिकेट, समूहनृत्ये, एकलनृत्ये, संगीतखुर्ची आणि उमाळ्याचा निसर्ग सहवास, मंदिराच्या नजिक असणाऱ्या नदीतील थंडगार पाण्याचा स्वानंद घेतला.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के, शिडवणे उपसरपंच दिपक पाटणकर, मनोहर कोकाटे, माजी उपसरपंच अनिल पांचाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, माजी अध्यक्ष दिनेश रांबाडे, दयानंद कोकाटेसर, डॉ. संजय कोकाटे, खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल, शेर्पे कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार, सावडाव केंद्रप्रमुख संतोष जाधव, शिक्षक मंगेश खांबाळकर, अरुणा वाळवेकर आणि बहुसंख्य पालक ), ग्रामस्थ उपस्थित होते. तळेरे, वारगाव, कोनेवाडी येथील पदाधिकारी पाहुणे उपस्थित होते. सर्वांनी वनभोजनातील मांसाहारी, शाकाहारी भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, तारीफ शेख, नदीम शेख, सुप्रिया पाष्टे, माजी सरपंच शीतल जाधव, श्याम भोवड, सचिन टक्के, योगेश सुतार, केतकर, सरिता केतकर, समिता सुतार, मनाली धुमाळ, रोशना पांचाळ, स्नेहा पांचाळ, श्रद्धा पाळेकर, अर्चना जाधव, सत्यवती वारिसे, सायली सुतार, मेघना सुतार, तारामती भोवड, अस्मिता भोवड, रश्मी भोवड, अन्वी येतकर, प्रेरणा कासार्डेकर , दर्शना रांबाडे, स्मिता पाष्टे, मंजुळा गुंडये, रुपाली पाष्टे, गुलाब निशानदार, रामचंद्र पाटणकर, प्रवीण पाटणकर, सुभाष धोंडू नर, समीर कुडतरकर, योगेश शिंदे, सचिन सुतार, गीतांजली पाष्टे, अर्चना भोवड, स्मिता पाष्टे, श्रीराम पाष्टे, अनिल गुंडये, सुनिल तांबे, सुजाता कुडतरकर, प्रवीण कुबल, सीमा वरुणकर आणि शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक यांचे मोलाचे आर्थिक व श्रम साहाय्य लाभले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)