तळेरे येथे 21 ला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा : सहभागासाठी आवाहन
संतोष साळसकर | शिरगांव: तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी क्रिडा मंडळाच्यावतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 जानेवारीला होणार असून सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 21 जानेवारीला दु. 3 वा. सुरु होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून अंतिम विजेत्या संघाला रोख रुपये 11 हजार 111, उपविजेत्या संघाला रोख रुपये 7 हजार 777 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. तर तृतीय व चतुर्थ विजेत्या संघाला प्रत्येकी रोख रुपये 2 हजार 555 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर इतर वैयक्तीक बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय सहभागी सर्व संघाना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री शेवरादेवी क्रिडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)