ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खुडी येथे अवकाश दर्शन कार्यक्रम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खुडी येथे अवकाश दर्शन कार्यक्रम!

प्रकाशन: 06 Jan 2023 08:32 PM
वाचन संख्या 35

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खुडी नं.१आणि खुडी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अवकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुर्यमाला,ग्रह,तारे,सप्तर्षी तारकासमूह,आकाशगंगा इत्यादींची सविस्तर माहिती रा.स्व.संघ संचलित देवगड तालुका फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प समितीच्या माध्यमातून श्री.मंदार माईणकर यांनी प्रोजेक्टरद्वारे छोट्या पडद्यावर करून दिली.त्यानंतर शाळेच्या समोरील मोठ्या पटांगणावर रात्रीच्या वेळेस ७.०० ते ९.३० पर्यंत दुर्बिणीतून सर्व मुलांना आकाशातील काही ग्रह-तारे यांचे दर्शन दाखविले.शनीभोवती असलेली कडी,गुरू,शुक्र,मंगळ, पाहताना विद्यार्थी खूप उत्साहीत होते.त्याशिवाय ध्रुवतारा,कृतिका तारकासमूह,तारे उगम-शेवट,अवकाश संशोधन इत्यादी माहिती सविस्तर तपशीलवार सांगितली.त्याच बरोबर रा.स्व.संघ जनकल्याण समिती जिल्हा कार्यवाह श्री.जयेश खाडीलकर, प्रकल्प शिक्षक श्री.भगिरथ राणे ,प्रकल्प प्रमुख श्री.चेतन पुजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.गोरे, खुडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदम , श्री.पास्ते ,श्री. तांबे ,श्री.योगेश पाटील ,श्री.साटम,सौ.सामंत मॅडम,श्री.वाळके श्री.राऊळ यांच्या प्रयत्नाने हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला गेला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. योगेश पाटील यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स