ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली परबवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

कणकवली परबवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

प्रकाशन: 03 Jan 2023 02:21 PM
वाचन संख्या 74

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली परबवाडी दत्तकृपा अपार्टमेंट येथे माऊली वस्तीस्तर पोयेकरवाडी संघाच्या वतीने आज सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाच्या अध्यक्षा सौ.दिव्या साळगांवकर व सचिव मंगल सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालुन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत कविता, ओव्या, समूहगीत, भाषणे अशा विविध प्रकारच्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी मयुरी सरंगले यांनी साकारलेली सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा विशेष आकर्षण ठरली.

लक्ष्मी गुरव, पुजा बिर्जे गुजर, सोनाली नारकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित मत व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमाला संघाच्या अध्यक्षा दिव्या साळगावकर, सचिव मंगल सावंत, उपाध्यक्ष रुपाली पोयेकर, खजिनदार रोहिणी मल्ली, निता बागवे, लक्ष्मी गुरव, सरीता चव्हाण, संगिता सारंग, सुचिता सोनी, सोनाली नारकर, मयुरी सरंगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स