ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तीन तपं व तीन वर्षांची  प्रामाणिक सेवा करुन अनिल कांबळी यांची एस.टी.महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती.

तीन तपं व तीन वर्षांची प्रामाणिक सेवा करुन अनिल कांबळी यांची एस.टी.महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती.

प्रकाशन: 03 Jan 2023 10:47 AM
वाचन संख्या 240

मालवण | सुयोग पंडित : राज्य परिवहन महाराष्ट्र च्या एस टीच्या कणकवली आगारचे मेकॅनिक कर्मचारी श्री अनिल हरिश्चंद्र कांबळी हे ३१ डिसेंबर २०२२ रोजी सेवा निवृत्त झाले. या निमित्ताने कणकवली आगार येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रम चे निवेदन वरीष्ठ लिपिक भाऊ गोसावी व विभागीय कार्यशाळेचे निवृत्त कर्मचारी सिनेअभिनेते अभय खडपकर यांनी केले. श्री.अनिल कांबळी यांनी तब्बल ३३ वर्षे सेवा बजावली आहे.

या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक प्रमोद यादव ,सिक्युरिटी ऑफिसर माने , श्री. मदने , डब्ल्यु येस राठोड , एच बी रावराणे ,नंदू कोरगांवकर ,अशोक राणे ,कृष्णा रावराणे ,घन :श्याम राणे ,अनिल लोकरे ,दिनेश गोगटे,गणेश शिरकर, काणेकर तसेच येस टी डेपो तील सर्व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते ,२०१३ मध्ये अनिल कांबळी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होऊन मार्च २०१५ मध्ये पूर्ण बरे होऊन ते आपल्या कामावर रुजू झाले ,कांबळी यांचे आपल्या कामावर व एस टी वर नितांत प्रेम असल्यामुळे व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे उपस्थित सर्व भावुक झाले तसेच मित्र परिवार व अधिकारी कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत अनिल कांबळी यांना शुभेच्छा दिल्या ,अनिल कांबळी यांच्या पत्नी सौ अक्षता कांबळी ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत तर दोन्ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत ,या वेळी अक्षता कांबळी यांनी मनोगत व्यक्त करून सेवा निवृत्ती चा संधिच्छा कार्यक्रम आयोजित केल्या बद्धल उपस्थितांचे आभार मानून आयोजकांचे धन्यवाद मानले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स