ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ मालवण तालुका संमेलन उत्साहात संपन्न….!

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ मालवण तालुका संमेलन उत्साहात संपन्न….!

प्रकाशन: 28 Dec 2022 01:16 PM
वाचन संख्या 324

विवेक परब | मुख्य संपादक :
महाराष्ट्र ब्राह्यण मंडळ सिंधुदुर्ग, मालवण तालुका संमेलन २०२२, रविवारी २५ डिसेंबरला विनोद अशोक गगनग्रास यांच्या घरी आशिष आपटे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ८ते दुपारी २. ३० या वेळेत उत्साहात संपन्न झाले.
श्री गणेश पूजन, श्री परशुराम महाराज स्मरण व गो पूजनाने संमेलनाने सुरूवात झाली. संमेलनाचे दीप प्रज्वलन भालचंद्र केळकर, आशिष आपटे व मंदार सरजोशी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी सामुहीकरित्या श्री अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक श्रीकृष्ण अच्युत वझे, मेघना जोशी यांनी ब्राम्हण ज्ञातीना आचार, विचार, संस्कार, धार्मिक दृष्टीकोन याबद्दल उत्तर मार्गदर्शन केले. निलेश सरजोशी, अर्चना हर्डिकर, श्रीपाद गिरसागर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर आनंद आपटे यांनी मधमाशा संरक्षण व संवर्धन या बाबत माहिती दिली. सर्वांना विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले.
या संमेलनाची जबाबदारी कट्टा दशक्रोशी विभागाची होती. पुढील तालुका संमेलन मसुरा विभागात होणार असल्यामुळे मसुरा विभाग अध्यक्ष मिलिंद कुंटे यांनी स्वप्निल आपटे यांच्या हस्ते संमेलनाचा नारळ स्विकारला. तालुका मासिक सभा १ जानेवारी २०२३ला मालवण विभागात होणार आहे.
पौराहित्य स्वप्निल आपटे व मंदार सरजोशी यांनी केले. सुत्र संचालन व प्रास्तविक उदय मेहंदळे यांनी केले तर अर्चना हर्डीकर यांनी जिल्हा संमेलना विषयी माहिती व सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स