कोईळ गणपती मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचा वर्धापन दिन २८ डिसेंबर रोजी..!
मसुरे | प्रतिनिधी :
एक गाव एक गणपती अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यतील श्री गणपती देवस्थान कोईळ देवालय जीर्णोद्धार सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २७ डिसेंबर रोजी नेत्र,आरोग्य तपासणी शिबीर स. ९.३० ते दुपारी. २.०० या वेळेत झाले.
२८ डिसेंबर रोजी सकाळी. ८.०० ते दुपारी.१२.०० धार्मिक विधी, दुपारी १२.०० ते १.०० महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद, सायंकाळी ४.०० ते ५.३० सत्यनारायण पूजा सायंकाळी ६.०० ते ७.०० आरती, सायंकाळी ७.०० ते रात्रौ ८.०० दिपोत्सव, रात्रौ ९.०० ते १०.०० सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ११ वाजता श्री सिद्धीविनायक नाट्य मंडळ – मुंबई दशावतार नाटक. हार्मोनियम – मयूर गवळी असणार आहेत.
सर्व गणेश भक्तांनी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन श्री गणपती देवस्थान – कोईळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)