ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

प्रकाशन: 26 Dec 2022 01:34 PM
वाचन संख्या 75

मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १६ सप्टेंबर २०२२ रोजी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या शिफारशी लक्षात घेतल्या जाणार आहेत. सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक, शाळा चुकीचा अर्थ काढतील, अथवा त्यातून पळवाटा काढतील, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता आहे. तशा पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि ‘परख’ या संस्थेने केलेल्या शिफारशी, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थिहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने यासाठी सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स