ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कवयित्री सरिता पवार यांना दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर..!

कवयित्री सरिता पवार यांना दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर..!

प्रकाशन: 23 Dec 2022 04:49 PM
वाचन संख्या 42

संतोष साळसकर | शिरगांव :
कणकवली येथील कवयित्री सरिता पवार यांना रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत अहमदनगरच्या मराठी विभागातर्फे देण्यात येणारा दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते १३ जानेवारी रोजी कर्जत अहमदनगर येथे त्यांना या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सरिता पवार यांच्या साहित्य लेखन आणि वैचारिक प्रबोधनातील योगदान लक्षात घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे भारतातील स्त्री आहेत.

शिक्षणाच्या प्रणेत्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे ३ जानेवारी रोजी होणार आहे. खासदार सुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त राज्यातील शिक्षिकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके (सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा), निमंत्रक आमदार रोहित पवार (सदस्य जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा), संयोजक प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी केली. या उद्घाटनानंतर निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार असून सरिता पवार या निमंत्रित कवयित्री म्हणून कविता सादर करणार

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स