ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण बांगीवाडा येथे चोरीचा प्रयत्न…!

मालवण बांगीवाडा येथे चोरीचा प्रयत्न…!

प्रकाशन: 26 Sep 2021 08:10 AM
वाचन संख्या 173

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल..!

वैभव माणगांवकर /मालवण : शहरातील बांगीवाडा येथील अथर्व कॉम्प्लेक्स मधील एक फ्लॅट अज्ञात चोरट्यानी फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना काल उघडकीस आली असून यात चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याबाबत मालवण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील बांगीवाडा येथे असलेल्या अथर्व कॉम्प्लेक्स मधील अक्षता चंद्रकांत तांबे (वय ५०) या परवा दुपारी अडीज वाजता आपला फ्लॅट बंद करून कणकवली येथे गेल्या होत्या. त्या काल मालवणात परतल्यानंतर त्यांना अज्ञाताने फ्लॅटचे कडी कुलूप फोडल्याचे दिसून आले.त्यांनी लागलीच पोलिसांना पाचारण केल्यानंतर फ्लॅट मधील कपडे विस्कटलेले दिसून आले. तांबे यांची कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे पाहणीत निष्पन्न झाले. दागिने व इतर किमती मुद्देमाल जैसे थे असल्याची माहिती तांबे यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे चोरीचा प्रयत्न होऊन चोरांच्या हाती काही लागलेले नाही. याबाबत मालवण पोलिस स्थानकात अक्षता तांबे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात ४५४, ४४७, ३८०, ५११ कलमानुसार अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांच्या मार्फत अधिक तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स