आमदार वैभव नाईक यांची वचनपूर्ती..!
गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रला नविन रूग्णवाहिका प्रदान
लवकरच होणार लोकार्पण सोहळा
ओंकार चव्हाण / पोईप : मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण ला नविन रूग्णवाहिका मिळणार आहे.
शिवसेना उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण यांनी यांची माहिती दिली.
गोळवण ग्रामस्थांनीदेखिल आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
शिवसेना उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, शाखाप्रमुख सुभाष सामंत,एकनाथ चव्हाण महीला शाखाप्रमुख प्राजक्ता परब, मंगल चिरमुले उपशाखाप्रमुख धनाजी चिरमुले , हेमंत परब , वासु पावसकर संदिप नाईक प्रभुगांवकर, गंगाराम गावडे , एम.जी . गावडे . भालचंद गावडे, काशिराम गावडे, युवा सेनेचे आनंद चिरमुले, तसेच विमागातील शिवसेना सरपंच यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती.व लवकरात लवकर आपण पालक मंत्र्याच्या माध्यमातून रुग्णवाहिका देऊ असे आमदार वैभव नाईक यानी आश्वासन दिले होते ते आता पूर्ण केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)