ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पालक क्रिडा दिन साजरा करत नाबर प्रशालेच्या पालकांनी अनुभवले बालपण.

पालक क्रिडा दिन साजरा करत नाबर प्रशालेच्या पालकांनी अनुभवले बालपण.

प्रकाशन: 20 Dec 2022 03:16 PM
वाचन संख्या 38

बांदा | राकेश परब :
प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी पालकांनी शाळेला भेट देणे गरजेचे असते. आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख, शाळेची प्रगती, समस्या व त्यावर उपाय या सर्व गोष्टी या सार्‍यांच्या परस्पर सहकार्यातून होऊ शकतात हे लक्षात घेऊन व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल, बांदा प्रशालेत दरवर्षी ‘ पालक क्रीडा दिन’ हा आगळावेगळा उपक्रम गेली सात वर्षे घेतला जात आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील नाबर प्रशाले पालक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री मनोज कामत, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. तनिशा सावंत, पालक प्रतिनिधी दिवाकर म्हावलंनकर, नवाज शेख, अश्विनी परुळेकर, राशी राणे, दिपक नाईक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई,उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रीडा मशाल पेटवून व श्रीफळ फोडून या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांसाठी संगीत खुर्ची, १०० मी. धावणे, २०० मी धावणे, रस्सीखेच, डॉज बॉल, क्रिकेट, स्लो सायकलिंग, लिंबू चमचा इत्यादी खेळ ठेवण्यात आले होते. पालकांनी या सर्व खेळांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ‘ बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले.

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे – 1)100 मी धावणे ( पुरुष) – प्रथम – श्री. दिलीप भिसे, द्वितीय – जनार्दन मालवणकर,तृतीय – निखिल खडपकर.2) http://localhost/news/public/uploads/200 मी धावणे ( पुरुष) प्रथम – श्री. दिलीप भिसे, द्वितीय – श्री जनार्दन मालवणकर,तृतीय – श्री निखिल खडपकर. 3)100 मी धावणे (महिला) प्रथम – सौ. सिया गवस, द्वितीय – सौ पूजा चव्हाण, तृतीय – सौ वैष्णवी देसाई. 4)संगीत खुर्ची -सौ प्रथम – तृप्ती धुरी, द्वितीय – अदिती घोगळे, तृतीय – नीलम पटेल 5) स्लो सायकलिंग – प्रथम – श्री दिलीप भिसे, द्वितीय – जनार्दन मालवणकर, तृतीय – निखिल खडपकर 6) लिंबू – चमचा – प्रथम – सौ राशी राणे, द्वितीय – प्रियांका कोठावळे, तृतीय – सौ नमिता गाड. 7)डॉज बॉल – विजेता ग्रुप – श्री स्वामी समर्थ ग्रुप, उपविजेता – श्री बांदेश्वर ग्रुप, 8) पासिंग द बॉल – विजेता ग्रुप – श्री स्वामी समर्थ ग्रुप, उपविजेता – सुपर मॉम्स.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक, आभार प्रदर्शन प्रशांत देसाई यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स