ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रविकिरण तोरसकरांच्या प्रयत्नांना यश.

रविकिरण तोरसकरांच्या प्रयत्नांना यश.

प्रकाशन: 19 Dec 2022 09:21 AM
वाचन संख्या 53

मालवण | सुयोग पंडित : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार ,परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक आर्हता असणाऱ्या युवक युवतींची कंत्राटी पद्धतीने २०२१-२०२२या कालावधी साठी भरती करण्यात आली होती.परंतु सन २०२२- २३ या कालावधीत सागर मित्र या पदासाठी नियुक्ती झालेली नव्हती.त्यामुळे मत्स्य व्यवसायात इच्छुक असलेल्या व्यक्तींना योजनेची माहीत व लाभ मिळविण्यात अडचणी येत होत्या.
सदर नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी श्री.अतुल काळसेकर , उपाध्यक्ष,सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मा. मत्स्योद्योग मंत्री श्री.सुधीर मुगंटीवार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा चालू होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र शासनाने दिनांक ०९ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून ‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. सदर अध्यादेश द्वारे पूर्वी काम केलेल्या सागर मित्रांना नियुक्त्या देणे चालू झाले आहे. सध्या सदर सागर मित्रांना चार महिन्या साठी नियुक्त केले जाणार असून भविष्यात त्यांचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.तरी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने चा लाभ घेऊ इच्छिनाऱ्यांनी सागरमित्र यांच्याशी संपर्क साधावा. तसेच पूर्वी काम करत असलेल्या सागरमित्र यांनी अथवा नवीन इच्छुकांनी संबधित जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स