१८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात.
मुंबई | ब्यूरो न्यूज :
१८ डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन दोन आठवडे म्हणजे २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यापूर्वीचे पावसाळी अधिवेशन देखील वादळी ठरले होते. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.
राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरण्याची शक्यता आहे. सीमावाद, वाढती महागाई, बेरोजगारी, मंत्रिमंडळ विस्तार अशा विविध मुद्द्यावरून विरोधक सत्ताधााऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)