ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवलचे माजी सरपंच अरुण राणे यांचे निधन..!

हळवलचे माजी सरपंच अरुण राणे यांचे निधन..!

प्रकाशन: 16 Dec 2022 08:58 PM
वाचन संख्या 40

कणकवली I प्रतिनिधी : शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख व हळवल गावचे माजी उपसरपंच अरुण घनश्याम राणे (४७) रा. हळवल नारळीची वाडी यांचे गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी रात्री हळवल मुख्य स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेचे कळसुली विभागाचे माजी विभागप्रमुख व हळवळ गावचे उपसरपंच या पदांवर काम करताना त्यांनी हळवल गावातील विविध प्रश्न सोडविले होते. हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. हळवल येथे १२ डिसेंबरला त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला होता. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स