ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रकाश लब्दे यांना महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर!

प्रकाश लब्दे यांना महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर!

प्रकाशन: 25 Sep 2021 04:42 PM
वाचन संख्या 120

मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व डोंबिवली येथील श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळाचे संचालक प्रकाश लब्दे यांन आर्ट बिटस् फौडेशन पुणे यांचे कडुन ‘आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान पुस्कार २०२१’, जाहीर झाला आहे.
घरात कोणीही कलाकार नसताना स्वतः बद्दल आत्मविश्वास आणि रंगदेवतेच्या कृपेने यश मिळाल्याचे लब्दे सांगतात. दशावतारी स्वतंत्र मंडळ निर्माण करून या कलेला पुढे नेण्याचा प्रयत्न नोकरी धंदा संभाळुन ते करतात. महाराष्ट्रा सह गोवा राज्य, तसेच झी मराठी, दूरदर्शन, कामगार कल्याण, सांस्कृतिक संचालनालय आयोजित दशावतार महोत्सव मध्ये उत्कृष्ट कलाकार पारीतोषक तसेच गोरगरीब पूरग्रस्त ,रक्त दान अशी समाजसेवा ते करतात. दशावतार कलेतुन लोकाना प्रबोधन, ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रकाश लब्दे यांच्या श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड – मुणगे डोबिवली यांस कडून होत असल्याने आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री प्रकाश लब्दे यांस महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर झाल्या मुळे डोंबिवली, मुणगे गावातून त्यांचे कौतुक होत आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन माझ्या सर्व सहकलाकार यांचा आहे असे लब्दे यांनी सांगितले आहे. आर्ट बिट्स पुणे यांचे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे ‘डोंबिवली यांस कडून आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स