कणकवलीतील भिरंवडे बिबवणे वाडीतील ५० कार्यकर्ते भाजपात सामील..!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा एक धक्का असल्याचे सूत्रांकडून समजते.
या प्रवेशावेळी सुनील भगवान सावंत, समीक्षा सावंत, प्रवीण सावंत प्रणिता सावंत राजे सावंत साक्षी सावंत निर्मला सावंत भिकाजी सावंत विना सावंत सुरेखा सावंत प्रकाश सावंत पुष्पांजला सावंत छाया सावंत रोहिणी धटने, सुनील सावंत चंद्रकांत सावंत सुनंदा सावंत मोहन सावंत, मनीषा सावंत शोभा सावंत रुपेश सावंत, पुष्पा सतीश सावंत, विलास सावंत पल्लवी सावंत प्रशांत सावंत प्रकाश मराठे प्रतीक्षा मराठी हर्षद मराठी सिद्धेश सावंत, शुभांगी सावंत, सुरेश सावंत श्रेया सावंत, सतीश शंकर सावंत, पूजा राणे, बाबाजी राणे, रंजना सावंत, जनार्दन सावंत, डिसोजा, निलेश जाधव, नीलिमा जाधव, गणपत राणे, विजया राणे, तनिष सावंत, शारदा सावंत, प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले आणि विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही प्रवेश कर्त्यांना दिली.
या वेळी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)