ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आशिये ग्रामपंचायत भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराला आरंभ.

आशिये ग्रामपंचायत भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराला आरंभ.

प्रकाशन: 14 Dec 2022 07:07 PM
वाचन संख्या 177

कणकवली | ब्युरो न्यूज : आशिये ग्रामपंचायत भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराचा शुभारंभ गांगोमंदिर येथे झाला. भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधीत करताना म्हणले की गेल्या १० ते १५वर्षात आशिये गावाला महेश गुरव यांच्या रुपाने नेतृत्व मिळाले आहे त्यामुळेच या गांवाची विकास कामातून ओळख निर्माण झाली आहे. पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला . कारण हा गांव शहरालगत असून विकासात्मक दृष्टया आणखी गतीमान वाटचाल व्हावी. महेश गुरव हे भरघोष मतांनी निवडून येतील यात कोणतीही शंका नाही. गावातील नागरिकांनी गावच्या सर्वांगिण विकासासाठी विरोधी उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करण्यासाठी काम करावे ,असे आवाहन भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले.
आशिये ग्रामपंचायत भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराचा शुभारंभ गांगोमंदिर येथे सरपंच शारदा गुरव , विलास खानोलकर , सुहास खानोलकर, उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, सदानंद बाणे, अनिल गुरव , अमोल गुरव , संतोष गुरव , प्रकाश पांचाळ, प्रविण ठाकूर , विठोबा सुरेश गुरव, सुनील बाणे, संजय बाणे, समीर ठाकूर, विलास गुरव , सत्यवान गुरव, रविंद्र गुरव , महादेव ठाकूर, विशाखा गुरव, रश्मी ठाकूर, किशोर बाणे, श्रीपाद बाणे आदींसह गावातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


विलास खानोलकर म्हणाले, आशिये गावात निवडणूक होणे ही दुर्दवी बाब आहे. गाव बैठकीत सर्वांमते महेश गुरव यांची सरपंच पदासाठी नाव निश्चिती करण्यात आली होती. तरी देखील कुरघोडी झाली आहे. गेल्या २० वर्षात झालेली विकास कामे ही महेश गुरव यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे विरोधी उमेदवाराला निकाला दिवशी आपली ताकद समजेल.
सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव म्हणाले, गावतील जनतेच्या आणि आमदार नितेश ंच्या आग्रहाखातर मी सरपंच पदाचा अर्ज भरला. केंद्रीय मंत्री नारायण , आमदार नितेश , माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून गेल्या २० वर्षात कोट्यावधीची विकासकामे आशिये गावात करण्यात आली आहेत. गांवची निवडणूक अनेक वर्षे बिनविरोध झाली होती. मात्र यावेळी गेली २५ गावाच्या विरोधात राहणा-या व्यक्तीने अर्ज दाखल केला. आता या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी लक्षणीय उपस्थिती पाहता निवडणूक मी जिंकणारच आहे. मात्र समोरच्या उमेदवाराचे डिपॉझीट सुध्दा राहता कामा नये साठीच आम्ही प्रचार फेरी काढली आहे. पुढच्या ५ वर्षात गावात एकही विकासकाम रखडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो , भारत माता की जय , साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर संपूर्ण गावात महेश गुरव यांच्या प्रचार फेरी काढत कपबशी निशाणी असल्याचे सांगुन प्रचार करण्यात आला. या प्रचारफेरीत महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स