ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
यशराज प्रेरणा, आचरा संघटने तर्फे सरपंच श्रीम. प्रणया टेमकर यांना निवेदन सादर…!

यशराज प्रेरणा, आचरा संघटने तर्फे सरपंच श्रीम. प्रणया टेमकर यांना निवेदन सादर…!

प्रकाशन: 14 Dec 2022 03:52 PM
वाचन संख्या 335

आचरा | प्रसाद टोपले : मालवण तालुक्यातील आचरा येथील यशराज प्रेरणा, संघटने मार्फत सरपंच श्रीम. प्रणया टेमकर यांना ग्रामपंचायत आचरा गावातील काही समस्यांबाबत निवेदन देण्यात आले..
या मध्ये पुढील विषय नमूद करण्यात आले आहेत. आचरा बाजार- तिठा परिसर येथे वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करणे , कर्ण कर्कश्य आवाज असणाऱ्या वाहन धारकांना योग्य प्रकारे समज देणे, मोकाट गुरे -बेवारस कुत्रे यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी , कुत्र्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी पर्याय उपलब्ध करणे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी गवत यांची छाटणी वेळीच करणे , बारमाही पाणी असणारे नागझरी पाझरतलाव याचे नैसर्गिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी सदरील तलावाचे आणि परिसराचे योग्य प्रकारे नूतनीकरण करणे, जेथे कचरा एकत्र केला जातो तेथे जागा सुचित करणारे फलक लावणे, जीर्ण रस्त्यांना नवसंजीवनी देणे- नूतनीकरण करणे. अशा प्रकारच्या कामांची मागणी यशराज प्रेरणा, आचरा संघटने च्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सरपंच श्रीम. प्रणया टेमकर यांनी आश्वासन दिले आहे.

या प्रसंगी यशराज प्रेरणा उपाध्यक्षा ॲड. उर्मिला आचरेकर, कार्यवाह मीनल कोदे, धनश्री आचरेकर, रवींद्र मुंबरकर, रोहित भिरवंडेकर, मिताली कोरगावकर, गायत्री वाडेकर ,अध्यक्ष मंदार सरजोशी आदी उपस्थित होते..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स