ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार नितेश राणे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करा : हनुमंत उर्फ राजा म्हसकर.

आमदार नितेश राणे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करा : हनुमंत उर्फ राजा म्हसकर.

प्रकाशन: 13 Dec 2022 05:31 AM
वाचन संख्या 101

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव शाखाप्रमुख आहेत राजा म्हसकर

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगावचे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे हनुमंत उर्फ राजा म्हसकर यांनी कणकवली -देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज तथा निवेदन दिले आहे.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत त्यामुळे आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही” अशी जाहीर धमकी आमदार नितेश राणे यांनी देत आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगांव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई न झाल्यास नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
राजा म्हसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबरला होत आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार असलेले रविराज मोरजकर यांचा प्रचार करण्यासाठी कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे ११ डिसेंबरल नांदगाव येथे आले होते. या दरम्यान दुपारी ३.०० वाजता नांदगाव तिठा येथे प्रचार सभेत भाषण करते वेळी आमदार नितेश राणे यांनी “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, माझ्या अधिकाराखाली आहेत.आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही” अशी धमकी सर्वांसमक्ष दिली त्याची व्हीडीओ क्लिप देखील वायरल होत आहे. आचार संहीतेच्या कालावधीत अश्या प्रकारची धमकी देऊन आ. नितेश राणे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या सदर वक्तव्याची व्हीडीओ क्लिप आपणास सादर करत आहोत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नांदगाव ग्रामस्थांमध्ये भयंकर चीड व दहशत निर्माण झाली आहे. तरी आचार साहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा नांदगाव ग्रामस्थांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजा म्हसकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स