इन्सुलीत आयशर आणि डंपर धडकले..!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने डंपरला आयशरची मागून धडक बसल्यामुळे अपघात झाला. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या
सुमारास इन्सुली-खामदेव नाका परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र आयशरच्या समोरील भागाचे व डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. तर या ठिकाणी अपघात घडण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरुन दोन्ही गाड्या भरता वेगात जात होत्या. यावेळी इन्सुली खामदेव नाका परिसरात त्या आल्या असता. स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने डंपर
चालकाने अचानक ब्रेक लावला. यावेळी मागून येणाऱ्या आयशर वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने डंपरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की आयशरच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाता नंतर बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)