साहित्यिक व भाषा तज्ञ अनुराधा दीक्षित यांचा वेंगुर्लेत सत्कार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या वाडा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, माजी शिक्षिका आणि भाषा तज्ञ सौ.अनुराधा दीक्षित यांचा वेंगुर्ले येथील ‘आनंदयात्री वांड़्मय मंडळ’ यांच्या तर्फे सत्कार संपन्न झाला.
वेंगुर्ले येथील त्रैवार्षिक साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार संपन्न झाला. सौ.अनुराधा दीक्षित यांच्या संस्कृत व मराठी भाषेतील साहित्यिक योगदानाबद्दल त्यांचा हा सत्कार संपन्न झाला. सौ.अनुराधा दीक्षित या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सृजनशील सामाजीक व शैक्षणिक चळवळींतही नेहमी योगदान देत असतात. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा , मुंबई , पुणे येथील विविध संस्थांनी देखील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
त्यांच्या या सत्काराबद्दल संपूर्ण राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)