उद्यापासून 'बेस्ट' कात टाकणार..!
विवेक परब | एडिटोरीअल असिस्टंट : देशाची आर्थिक राजधानी,स्वप्नांची नगरी असणार्या मुंबई व मुंबईकरांचा अत्यावश्यक गरजेचा जिव्हाळा म्हटल्या जाणाऱ्या बेस्टने ( Best ) आता महिला तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना संपूर्ण सुरक्षित प्रवास करता येईल अशी ‘प्रिमियम सेवा’ आणली असून तिची निवड आता मुंबईकर बिनधास्त करु शकणार आहेत. कारण त्यात भरपूर ‘सेफ्टी फिचर्स’ देखील आहेत.
बेस्ट आता ‘कात’ टाकत असून बेस्ट उद्या १२ डिसेंबरपासून आपली प्रिमियम सेवा लाँच करीत आहे.
या बसेस सिटीफ्लाे धर्तीच्या वातानुकूलीत असल्या तरी बेस्ट त्यांच्या एक पाऊल पुढे म्हणजेच बेस्टच्या बसेस या ईलेक्ट्रीक असतील. विशेष म्हणजे या ‘प्रिमियम’ सेवेचे भाडे किलोमीटरला साडे चार रूपये इतके असणार आहे. आपल्या सर्व प्रिमियम शहर बस सेवा ईलेक्ट्रीक असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.
बेस्टच्या नव्या प्रिमियम सेवेत प्रवाशांना चलो मोबाईल एपवरुन तिकीट आरक्षित करता येणार आहे. शिवाय या ‘चलो मोबाईल’ एपवरुन या बसला ट्रॅकही करण्याची सोय असणार आहे. या सेवेसाठी धुर आणि ध्वनी प्रदुषणमुक्त इलेक्ट्रीक बसचा वापर केला असल्याने प्रवाशांना अत्यंत आरामदायी सफर घडणार आहे. या बसेस प्रवाशांच्या सेवेत उद्या सोमवार १२ डिसेंबरपासून येत आहेत. या बसेसमध्ये आरामदायी आसने, मोबाईल चार्जिंगसह सर्व सुख सुविधा असणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)