पोलीस दलात आता तृतीयपंथीयांनाही संधी.
विवेक परब | एडिटोरीअल असिस्टंट (ब्युरो न्यूज) : पोलिस दलातील भरती प्रक्रियेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तृतीयपंथीयांसाठी अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय ठरणार आहे. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना देखील संधी मिळणार आहे.पोलीस भरतीमध्ये यापुढे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयार असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश दिले असून फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नियम न बनवल्याबद्दल राज्य सरकारला चांगलेच सुनावले होते. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी तृतीयपंथी अर्ज करू शकतात. राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयार असल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. यासोबतच तृतीयपंथी शारीरिक चाचणीशी संबंधित निकषांशी संबंधित नियम फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2023 पर्यंत तयार केले जातीलअसे देखील यावेळी सांगण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)