ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दिवंगत निलेश काणेकर यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे झाले सखोल तपासणी अंती निष्पन्न.

दिवंगत निलेश काणेकर यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे झाले सखोल तपासणी अंती निष्पन्न.

प्रकाशन: 11 Dec 2022 01:19 PM
वाचन संख्या 104

फोंडाघाटात कारमध्ये जळालेला तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच.

कणकवली पोलिस ठाण्याला डी एन ए अहवाल मिळाले.

कणकवली | ब्युरो न्यूज : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीकडे येत असताना फोंडाघाटाच्या प्रवेशानंतर खिंडी पासून काही अंतरावर वागदे येथील उद्योजक निलेश विवेकानंद काणेकर (४५) उर्फ एन के यांच्या अर्टिगा कारला १० मार्चला आग लागून ती कार पुर्णपणे जळल्याची घटना समोर आली होती. यामध्ये चालकाचा जळालेल्या अवस्थेत सांगडा आढळून आला होता. जळालेली कार निलेश काणेकर यांचीच असल्याने व त्या परिसरात त्यांचे मोबाईल लोकेशन आढल्याने तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच असल्याचा संशय होता. मात्र पोलिसांनी याबाबतची खात्री करण्यासाठी सांगडयातील हाडांमधील अवशेष आणि निलेश काणेकर यांच्या नातेवाईकांचे नमुने कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणीसाठी पाठविले होते. अलीकडेच या प्रयोगशाळेचा अहवाल कणकवली पोलिसांना प्राप्त झाला असून ते डीएनए नमुने नातेवाईकांशी मिळते जुळते असल्याने जळालेल्या कारमधील सांगाडा हा निलेश काणेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती तपासी अधिकारी कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली. तसेच कार जळल्याची दुर्घटना ही अपघातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योजक निलेश काणेकर हे कामानिमित्त त्यांची नवी अर्टिगा कार घेऊन १० मार्चला कोल्हापूर-राधानगरीला गेले होते. संध्याकाळी ५ च्या दरम्यान फोंडाघाटापासून वरच्या बाजूला खिंडीपासून काही अंतरावर देवगड-निपाणी मार्गावर रस्त्याच्या बाजूला एक कार जळताना आढळून आली होती. मात्र आगीची दुर्घटना एवढी भीषण होती की कार पूर्णपणे जळून गेली होती. कारच्या नंबरवरुन ती कार निलेश काणेकर यांचीच असल्याचे स्पष्ट झाले होते. कारमध्ये चालकाच्या सीटवर सांगडा आढळला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना फोंडाघाट चेकपोस्टवरील सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता त्याच दिवशी निलेश काणेकर यांची कार राधानगरीच्या दिशेने गेल्याचे दिसून आले होते. तर त्या परिसरात निलेश काणेकर यांचे मोबाईल लोकेशन आढळून आले होते. त्यामुळे तो मृतदेह त्यांचाच असल्याचा संशय होता. दरम्यान त्याच रात्री उशिरा जळालेल्या गाडीतील तो मृतदेह काणेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मात्र नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आल्याने याबाबत पोलिसांकडून सर्व प्रकारे तपास सुरू होता. त्या दिवशी निलेश काणेकर हे आपण राधानगरीला जातो असे सांगून कार घेऊन बाहेर पडले होते. दरम्यान याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्या सांगाडयाच्या हाडांचे नमुने कोल्हापूर येथील लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. त्यासाठी पोलिसांनी श्री. काणेकर यांच्या नातेवाईकांचे नमुने घेतले होते. जवळपास सात महिन्यांनी डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्या सांगाडयातील अस्थींचे नमुने आणि काणेकर यांच्या नातेवाईकांचे नमुने मिळते जुळते असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो मृतदेह निलेश काणेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नातेवाईकांचीही त्याबाबत खात्री झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी सांगितले. दरम्यान कारला लागलेली आग ही अपघातच असून तो घातपात नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स