ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
च़ल जहां ग़मके मारे ना हो, झूठ़ी आशा के तारे ना हो…!

च़ल जहां ग़मके मारे ना हो, झूठ़ी आशा के तारे ना हो…!

प्रकाशन: 11 Dec 2022 11:13 AM
वाचन संख्या 201

( दिलीप कुमार जन्मदिन विशेष..!)

सिनेपट | जन्म दिनविशेष : भारतीय सिनेमा सृष्टीमध्ये मोहम्मद युसूफ ख़ान अर्थात् अभिनेते दिलीपकुमार यांचे आदरस्थान अग्रस्थानी आहे.
ते हिंदी सिनेमासृष्टीत, दीर्घकाळ आणि अखंड असे रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले पहिले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
बाॅलीवुडचे पहिले अस्सल सुपरस्टार ‘ख़ान’ अशीही दिलीपकुमार यांची छबी आहे.
दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि सोबतच सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीत तथा प्रोफाईलमध्ये असल्याने त्यांच्या अभिनय क्षमतेचे सातत्य लक्षात येते.

१९४४ सालच्या ‘ज्वारभाटा’ या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. नंतर जवळपास पाच दशके म्हणजे त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी मिळाली.
अंदाज़, आन, दाग़, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा असंख्य चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
मध्यंतरी पाच वर्षे अभिनयापासून दूर राहून त्यांनी ‘क्रांती’ सिनेमाद्वारे पुनरागमन केले. १९८० च्या दशकातील सुरवातीचा सिनेमा ‘शक्ती’ म्हणजे सिनेमा रसिकांना, दिलीप कुमार आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चनजी यांच्या अभिनयाचा जणू ‘कसोटी सामना’ वाटला.
नंतर मशाल, कर्मा, सौदागर अशा रसिकांची आजही पसंती असलेल्या सिनेमांमधून दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध झाले.
१९९८ साली आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला ज्यात रेखाजींनीही महत्वाची भूमिका वठवली होती. दिलीपकुमार हे ‘बॉलिवूडच्या सुवर्ण युगातील’ शेवटचे रत्न होते असे म्हणले जाते.

Article image

आज मोहम्मद युसूफ ख़ान म्हणजे दिलीप कुमार यांचा जन्मदिन.
तल़त मेहमूद यांनी त्यांना आवाज दिलेले एक गीत आहे “ऐ मेरे दिल कही और चल…ग़मकी दुनिया से दिल भर गया’ …त्यातील एक कडवं दिलीपजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे.
“च़ल जहां ग़मके मारे ना हो..
झूठ़ी आशाके तारे ना हो…,” अगदी याच ओळींप्रमाणे आजन्म स्वतःचा सन्मान स्वतः राखत काम करुन वास्तवात नेहमी जगलेल्या या अभिनेत्याला जन्मदिना निमित्त ‘सिनेवंदना!’

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स