पिसेकामते येथील मंदिरात चोरट्यांनी फोडली दानपेटी…!
कणकवली । ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्यातील पिसेकामते येथील श्री पावणादेवी, रवळनाथ मंदिर आणि लिंगेश्वर मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील सुमेरे ८७०० रुपयांची रोख रक्कम चोरली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची तक्रार मंदिर समितीचे सदस्य अनिल आत्माराम गांवकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. शुक्रवारी सकाळी ते मंदिरामध्ये गेल्या असतात मंदिराच्या पुढील दरवाजाचा कडी-कोयंडा काढून अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दोन्ही फंडपेटी उकडून काढून आतील रोख रक्कम लांबविली आहे हे लक्षात आले. यापूर्वी मंदिरात १९ जूनला अशाच पद्धतीने चोरी झाली होती. गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे.
याबाबत पोलिस तपास करत असून सायंकाळी श्वान पथकालाही पाचारण करून तपास करण्यात आला. मात्र, संशयिताचा माग उशीरापर्यत लागला नव्हता. येथील पावणादेवी रवळनाथ मंदिर आणि लिंगेश्वर मंदिराच्या लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा चोरट्यानी उचकटून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडून पावणादेवी रवळनाथ मंदिरातील ५४०० रुपये व लिंगेश्वर मंदिरातील ३३०० रुपयांची रक्कम व चिल्लर अज्ञात चोरट्यानी लंपास केली. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)