ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
टोलमुक्तीसाठी जिल्हा व्यापारी संघातर्फे बैठकीचे आयोजन ; जिल्हावासियांना एकवटण्याचे आवाहन.

टोलमुक्तीसाठी जिल्हा व्यापारी संघातर्फे बैठकीचे आयोजन ; जिल्हावासियांना एकवटण्याचे आवाहन.

प्रकाशन: 07 Dec 2022 07:48 AM
वाचन संख्या 53

सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील मुंबई गोवा महामार्गावरील रस्ता काम अद्याप पूर्ण झाले नसताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगांव येथे टोल नाका उभारून टोल वसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग वाहनांना टोल फ्री देण्यात आला नाही त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात असून आंदोलन उभारले गेले पाहिजे असे जनमत तयार होत असताना येत्या ९ डिसेंबरला एका बैठकीचे आयोजन
करण्यात आले आहे.टोलमुक्त सिंधुदुर्ग होण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून शुक्रवार दि. ९ डिसेंबर जिल्हावासियांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात सायंकाळी ४ वाजता महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, असे निमंत्रक नंदन वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम झाले आहे. मात्र रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील काम सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व काम झाले नसल्याने टोल वसुली करणे योग्य नाही असे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत तसेच केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गावर टोल नसेल असे म्हटले होते या आठवणींना उजाळा दिला जात आहे. समृध्दी महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली तशीच पहाणी या रस्त्यावर व्हावी अशी मागणी केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली नको म्हणत असताना काहींनी सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग वाहनांना टोल फ्री झालाच पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान टोल फ्री करण्याच्या मुद्यावर चर्चा करून आंदोलनात्मक पावित्रा घेतला पाहिजे तर काहींनी न्यायालयीन लढा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे या बैठकीत मोठ्या संख्येने जिल्हावासी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स