ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचे उत्साहपूर्ण स्वागत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचे उत्साहपूर्ण स्वागत.

प्रकाशन: 02 Dec 2022 08:21 PM
वाचन संख्या 62

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे सुपुत्र, युवा नेतृत्व तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मनसे पदाधिकारी व कार्यकत्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी मनसे पक्ष व राज ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाभरातील मनसे कार्यकर्ते श्री. ठाकरे यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.

ठाकरे हे मालवण तालुक्यातून मसुरे आंगणेवाडीतून आचरामार्गे सकाळी ११.३० वाजता कणकवलीत दाखल होणार होते. त्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची आप्पासाहेब पटवर्धन चौकात प्रचंड गर्दी जमली होती. कोणत्याही पक्षाचे नसलेल्या पण, राज ठाकरे यांना प्रत्यक्ष बघू इच्छिणाऱ्यांचीही गर्दी मोठी होती. गर्दी वाढत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकासह महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दुपारच्या सुमारास ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा कणकवलीत दाखल झाला अन् मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. ढोलपथकाने परिसर निनादून सोडला. कार्यकर्त्यांनी ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री आदींसह मनसे पदाधिकाऱ्यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी वाहनामधून न उतरता केवळ फुट स्टँडवर पाय ठेवला व पुष्पगुच्छ स्विकारत उपस्थितांना हात जोडत अभिवादन स्विकारले. त्यानंतर ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे मार्गस्थ झाला.

फोटो सौजन्य | कणकवली ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स