ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी केंद्रबल गटाच्या क्रीडा महोत्सवात केंद्र शाळा साळशीचा चौफेर दबदबा ; पि टी उषा चॅम्पियनशिपला घातली गवसणी.

साळशी केंद्रबल गटाच्या क्रीडा महोत्सवात केंद्र शाळा साळशीचा चौफेर दबदबा ; पि टी उषा चॅम्पियनशिपला घातली गवसणी.

प्रकाशन: 02 Dec 2022 06:10 PM
वाचन संख्या 214

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी केंद्र बलाच्या बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात साळशी केंद्र शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगीरी केली असून लहान गटाच्या विद्यार्थ्यांनी पी.टी.उषा जनरल चॅम्पियनशिप पटकावली.

लहान गटात मुलींमध्ये ५० मीटर धावणे लक्ष्मी गावकर प्रथम क्रमांक, गौरी नाईक द्वितीय क्रमांक मुलगेमध्ये कौस्तुभ गावकर प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे मुलींमध्ये दर्शना लब्दे द्वितीय क्रमांक, मुलांमध्ये भूषण देवणे प्रथम क्रमांक, लांब उडी मुुलगे मध्ये कौस्तुभ गावकर प्रथम क्रमांक, भूषण देवणे द्वितीय क्रमांक, उंच उडी मुलींमध्ये रूपाली साटम द्वितीय क्रमांक, गौरी नाईक तृतीय क्रमांक, मुलांमध्ये साईराज गावकर प्रथम क्रमांक, ५० × ४ रिले मुुलीमध्ये दर्शना लब्दे ,लक्ष्मी गावकर, रुपाली साटम , गौरी नाईक,यांचा प्रथम क्रमांक, मुलांमध्ये कौस्तुभ गांवकर, विराज कोदले, भूषण देवणे, साईराज देवणे प्रथम क्रमांक, कबड्डी मुुलगेमध्ये उपविजेता ठरला. ‘ज्ञानी मी होणार’ मध्ये विराज कोदले व कौस्तुभ गांवकर यानी प्रथम क्रमांक मिळविला.समूहगीत व समूहनृत्य मध्ये प्रथम क्रमांक मिळाला

मोठ्या गटात १०० मीटर धावणे मुलींमध्ये तनिषा गावकर, प्रथम क्रमांक, जान्हवी गावकर द्वितीय क्रमांक, मुलगे मध्ये रुपल साळसकर, प्रथम क्रमांक २०० मीटर धावणे मध्ये वैदेही ओटवकर तृतीय क्रमांक, लांब उडी मुुलीमध्ये तनिषा गांवकर प्रथम क्रमांक, श्वेता परब द्वितीय क्रमांक, उंच उडी मुुलीमध्ये जान्हवी गांवकर प्रथम क्रमांक, मुुलांमध्ये रुपल साळसकर द्वितीय क्रमांक, गोळा फेक मुली मध्ये दिक्षिता साळसकर द्वितीय क्रमांक, आर्या मिराशी तृतीय क्रमांक मुलांमध्ये हर्षद पोईपकर प्रथम क्रमांक, १०० × ४ रिले मुलीमध्ये तनिषा गावकर, जान्हवी गांवकर, वैदेही ओटवकर, श्वेता परब यांचा द्वितीय क्रमांक, तसेच मुलांमध्ये रूपल साळसकर मिथुन मणचेकर धीरज घाडी, सिध्देश राणे, कबड्डी मध्ये उपविजेता तर ज्ञानी मी होणार मध्ये रुपल साळसकर , हिमानी घाडी प्रथम क्रमांक, समुहनृत्यामध्येही शाळेला प्रथम क्रमांक मिळाला.

यावर्षीच्या स्पर्धेत केंंद्र शाळा साळशी क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी पी.टी.उषा चॅम्पियनशिप पटकावली.
यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख वर्षा लाड, केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम, संतोष मराठे , हेमलता जाधव, स्मिता कोदले या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर साळसकर,वैभव साळसकर, पालक, ग्रामस्थ,यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स