ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणीसाठी मुख्याध्यापक हरिश्चंद्र सरमळकर यांचा सत्कार

मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणीसाठी मुख्याध्यापक हरिश्चंद्र सरमळकर यांचा सत्कार

प्रकाशन: 24 Sep 2021 11:23 AM
वाचन संख्या 70

चाफेड | संतोष साळसकर : मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणीसाठी देवगड तालुक्यातील चाफेड शाळा नं 1 चे मुख्याध्यापक हरिश्चंद्र कृष्णा सरमळकर याना सन http://localhost/news/public/uploads/2020-21 सालचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या सहिनीशी मुख्याध्यापक सरमळकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. चाफेड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून मुख्याध्यापक सरमळकर यांनी नेहमीच मेहनत घेतली आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत सर्व क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी यासाठी सरमळकर यांचा विशेष लक्ष असतो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त असलेल्या सरमळकर यांनी मुलींच्या पटनोंदणीत केलेल्या लक्षणीय कामाची दखल जिल्हा परिषदेने घेत त्यांना मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणीसाठी चा पुरस्कार प्रमाणपत्र स्वरूपात दिला आहे.साळशी केंद्रप्रमुख वर्षा लाड यांच्या हस्ते मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणी बाबतचे प्रमाणपत्र हरिश्चंद्र सरमळकर याना प्रदान करण्यात आले.यावेळी साळशी शाळा नं 1 चे मुख्याध्यापक गंगाधर कदम, कुवळे शाळा नं 1 चे मुख्याध्यापक विष्णू परब, रेंबवली शाळा नं 1 चे मुख्याध्यापक सुगंध तांबे, चाफेड भोगलेवाडी च्या रश्मी आंगणे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स