ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्यातील खेळाडुंची अनेक वर्षे रखडलेली महत्वाची मागणी पूर्ण.

राज्यातील खेळाडुंची अनेक वर्षे रखडलेली महत्वाची मागणी पूर्ण.

प्रकाशन: 01 Dec 2022 07:58 AM
वाचन संख्या 48

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संबंधीत प्रणाली कार्यान्वीत .

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्र राज्यात राज्य-राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणीसाठी क्रीडा विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे उद्‌घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने क्रीडा संचलनालय व मंत्री महोदयांकडे अनेक वेळा मागणी केली होती, अखेर आज ते साकारत आहे.
यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देवल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, क्रीडा विभाग क्रीडा विभागाचे उप सचिव सुनिल हंजे उपस्थित होते.
क्रीडा प्रमाणपत्र वैधता मिळविण्यासाठी खेळाडूंना हेलपाटे मारावे लागत होते. तसेच प्रत्येक विभागात प्रमाणपत्र वैधतेबाबत विसंगती होती. तसेच बोगस खेळाडूंचे प्रमाणपत्रही प्रमाणित होत असे त्यामुळे चांगल्या खेळाडूवर अन्याय होत असे. ऑनलाईन प्रणालीने मात्र या गोष्टीला आळा बसून व्हेरीफिकेशनचा मार्ग सुकर होणार आहे. क्रीडा युवक सेवा संचलनाल्याचे उपसंचालक, सह संचालक, आयुक्त यांचे क्रीडा शिक्षक महासंघाचे वतीने शासनाच्या या कार्यप्रणालीचे स्वागत करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स