दोडामार्ग मध्ये पतंजली योगवर्गाचे आयोजन ; अनेक व्याधींच्या निवारणासाठी होणार योग उपचार मार्गदर्शन.
बांदा | प्रतिनिधी : आरोग्यविषय सुप्रसिद्ध अशा ‘पतंजली योग समिती सिंधुदुर्ग’, यांच्या मार्फत गुरुवारी १ डिसेंबरला दोडामार्ग शहरामध्ये पतंजली योग वर्ग चालू करण्यात येत आहे.
मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष योगोपचार मार्गदर्शन आणि योगाभ्यास होईल. हा योग वर्ग श्री सिद्धिविनायक मंदिर दोडामार्ग येथे दररोज सकाळी ५:३० ते ७ या वेळेमध्ये चालू करण्यात येत आहे .
दोडामार्ग शहरातील सर्व योगाभ्यास प्रेमी साधकांनी या योगवर्गाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .
अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर ९८२३८८१७१२ श्रवणकुमार राजपुरोहित ९४२३३०१७३३ यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)