ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अनेक भाजपा कार्यकर्ते शिवबंधनात.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अनेक भाजपा कार्यकर्ते शिवबंधनात.

प्रकाशन: 27 Nov 2022 07:03 PM
वाचन संख्या 54

आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोळपे गावातील भूसारवाडीतील भाजपा वैभववाडी तालूका अध्यक्ष नासिर काझी यांचे खंदे समर्थक करीम इसफ यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करून हाती शिवबंधन बांधले.

यावेळी विशेष मार्गदर्शन व स्वागत करताना आमदार वैभव नाईक म्हणाले, आज संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य
मुस्लिम बांधव शिवसेनेत दाखल होत आहेत. आज भारतीय जनता पक्ष फक्त भोंग्या सारख्या व लव्ह जिहाद सारखे विषय निर्माण करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या वेळी विरोधकांकडून मशिदीच्या भोंग्यावरून वाद सुरू करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण करू दिले नाही.

केंद्र सरकारने जनतेला गेल्या 8 वर्षामध्ये जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाही म्हणून जनता जाब विचारेल या भीतीने भाजपचे नेते, प्रवक्ते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काही असंस्कृत लोकांना पुढे करून वाद विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण कोळपे गावातील सर्व मुस्लीम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या कोळपे गावातील व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी एक कुटुंबप्रमुख व लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच राहीन. आपण सुद्धा सर्वांनी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कार्यतत्पर राहावे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणारे करीम इसफ यांच्या नेतृत्वाखाली सुलेमान पाटणकर, इम्रान पाटणकर, मोहसीन पाटणकर, अजीम काझी, कय्युम ठाणगे, मुबिन ठाणगे, मुजाहित इसफ, सरदार ठाणगे, सत्तार बवकर, बरकत भेरी, हमीद ठाणगे, इब्राहीम माखना, अजीम ठाणगे,सिराज ठाणगे, अमीर ठाणगे, इस्माईल मुकरी, अकिब ठाणगे, मुअज्जम ठाणगे, नजीर वाघू, इक्बाल काझी मुबिन पाटणकर, शरीफ ठाणगे, रज्जाक इक्बाल, अजीम इसफ, मुश्ताफ काझी, दिलावर भेरी, सुलेमान पाटणकर, इम्रान पाटणकर, मोहसीन पाटणकर, अजीम इक्बाल काझी, यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांसह कोळपे बौद्धवाडीतील महिलांनी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी
सदस्य संदीप सरवनकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामियाँ पाटणकर, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, उंबर्डे उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, उपतालुका प्रमुख श्रीराम शिंगरे, तालुका कार्यकारणी सदस्य पांडुरंग पांचाळ, यशवंत सुर्वे, जयराज हरयाण, विलास पावसकर, गुलझार काझी, समीर लांजेकर, शहाबान राऊत, सल्लाउद्दीन नाचरे, हमीद राऊत यांनाआदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स