'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली मालवण कार्यालयाला भेट.
मालवणच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी केला सत्कार.
मालवण | प्रतिनिधी : गेल्या काही दिवसात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेशासाठी गावागावात सर्वच ठिकाणावरून प्रतिसाद वाढत आहे. पक्षाकडून ग्रामपंचायत निवडणुका लढवण्यासही अनेकजण इच्छुक आहेत. भाजपासोबत युती करून निवडणूक लढवण्याबाबतही चर्चा सुरु आहे. मात्र, काही ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना स्वतंत्र ही निवडणूक लढवेल. अपेक्षीत यश प्राप्त केले जाईल असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी मालवण येथे शनिवारी व्यक्त केला आहे.
जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर संजय आंग्रे यांनी पहिल्यांदाच मालवण कार्यालयात भेट दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, भास्कर राणे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, किसन मांजरेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरुण तोडणकर, बाळू नाटेकर, नीलम शिंदे, भारती धारकर, युटीन फर्नांडीस, राजा तोंडवळकर, तोडणकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मालवण भरड येथील सौ. सोनाली सर्वेश पाटकर यांनी यावेळी संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. समाजासाठी सातत्यपूर्ण काम करताना पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सौ. पाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरूनही भक्कम पाठिंबा असल्याने या निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त होईल. गावाच्या, वाडीच्या विकासासाठी पक्ष कटीबद्द आहे. जनतेला अपेक्षित काम राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, किरण सामंत व सर्व चांगले काम करत आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याने. पक्षाला पाठिंबा वाढत असल्याचे संजय आंग्रे यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)