संगीत नाटक अकादमीच्या 'अमृत पुरस्कार' महाराष्ट्र राज्यातील ९ मान्यवरांचा समावेश.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : संगीत नाटक अकादमीच्या अमृत पुरस्कारांची घोषणा झाली असून यात महाराष्ट्रातील मालिनी राजुरकर , आरती अंकलीकर-टिकेकर, प्रशांत दामले यांचे सह महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.
संगीत नाटक अकादमीने गेल्या तीन वर्षांचे (२०१९, २०२० आणि २०२१) पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. त्यांत महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांचा समावेश आहे. अकादमीने देशभरातील ७५ कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’ही जाहीर केला आहे.वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांत महाराष्ट्रातील सहा कलाकारांचा समावेश आहे.
अकादमीच्या पुरस्कारविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मालिनी राजुरकर (सहअध्यायी), आरती अंकलीकर-टिकेकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), प्रशांत दामले (अभिनय), उदय भवाळकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), शमा भाटे (नृत्य), पांडुरंग घोटकर (लोकसंगीत), माजिद गुलाबसाहेब सतारमेकर (वाद्यनिर्माण), नंदकिशोर कपोते (समग्र योगदान), मीना नायक (कळसूत्री बाहुल्या) यांचा समावेश आहे.
‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’विजेत्यांमध्ये अमृत महोत्सव साजरा केलेल्या सहा मराठी कलाकारांचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांचा या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे. या कलाकारांत आंध्र प्रदेशातील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन आणि महाराष्ट्रातील सहा कलाकारांचा यात समावेश आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)