ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना हरकुळ बु. विभागप्रमुख पदी मंगेश सावंत ; उपविभागप्रमुख पदी नित्यानंद चिंदरकर यांची नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना हरकुळ बु. विभागप्रमुख पदी मंगेश सावंत ; उपविभागप्रमुख पदी नित्यानंद चिंदरकर यांची नियुक्ती.

प्रकाशन: 25 Nov 2022 02:59 PM
वाचन संख्या 55

कणकवली | प्रतिनिधी :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हरकुळ बु. विभागप्रमुख पदी बंड्या रासम हे पूर्वी कार्यरत होते. मात्र नुकत्याच झालेल्या शिवसेना पक्षीय बैठकीत बंड्या रासम यांच्या जागी हरकुळ बु. विभागप्रमुख पदी मंगेश सावंत ( माजी पंचायत समिती सदस्य ) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर हरकुळ बु. उपविभागप्रमुख पदी नित्यानंद चिंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख आ. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली आहे. युवासेना उप तालुकाप्रमुख (हरकुळ, नाटळ) पदी राजू पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,रामू विखाळे, हर्षद गावडे,रुपेश आमडोसकर, बंडू ठाकूर, महेंद्र डिचोलकर, बेनी डिसोझा, फैयाज खान, उत्तम लोके, भालचंद्र दळवी, अमोल राणे, काका राणे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स