ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ठाकर समाज बांधवानी आम. नितेश राणेंची भेट घेऊन मानले आभार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ठाकर समाज बांधवानी आम. नितेश राणेंची भेट घेऊन मानले आभार.

प्रकाशन: 25 Nov 2022 01:58 PM
वाचन संख्या 47

वैभववाडी I नवलराज काळे : सिंधुदुर्ग ठाकर समाजच्या पदाधिकाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या समस्येबाबत आमदार नितेश राणे यांची भेट घेतली होती. आम. नितेश राणे यांनी तात्काळ त्या पडताळणी समितीवरील उपायुक्त पावरा यांच्याशी संपर्क केला व त्यांच्याशी ठाकर समाजाच्या प्रश्नाबाबत बोलणं केलं. काही तासांमध्येच रखडलेली कामे सुरू केली व ठाकर समाजाला दिलासा दिला. त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक प्रश्न, नोकरीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

आज ठाकर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी प्रहार भवन येथे आम. नितेश राणे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, सल्लागार नामदेव ठाकूर, भास्कर गंगावणे, गुढिपूर उपसरपंच सागर रणसिंग, आशिये माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, कार्यकारणी सदस्य साईनाथ यादव, उमेश ठाकूर, अच्युत मसगे, दीपक सिंगनाथ, स्वप्नील ठाकूर, निलेश गवाणकर, सचिन ठाकूर आदी. समाज बांधव उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स