ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची रुपरेषा जाहीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची रुपरेषा जाहीर..!

प्रकाशन: 25 Nov 2022 11:31 AM
वाचन संख्या 97

मनसैनिकांतर्फे स्वागताची जय्यत तयारी .

मनसैनिकांची दौर्याची उत्कंठा शिगेला..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर अशा तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध मान्यवरांच्याही भेटी घेणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

Article image

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० रोजी दुपारी सावंतवाडी . येथील पक्ष कार्यालयाला भेट देणार आहेत. १ डिसेंबरला सकाळी १० वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक, ११.३० वाजता कुडाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक असून या दोन्ही बैठका हॉटेल आराध्य (कुडाळ) येथे होणार आहेत. दुपारी १ वाजता भोजन व ३.३० वाजता मालवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे होणार आहे. ठाकरे ५ वाजता मालवण येथील पत्रकार व मान्यवरांच्या भेटी घेणार असून रात्री किल्ला हॉटेल येथे मुक्काम आहे. २ रोजी सकाळी १० वा, आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे दर्शन व तेथून कणकवलीकडे प्रयाण, ११ वा. येथील जलतरण हॉटेल येथे पत्रकार व मान्यवरांच्या भेटी, ३ वा. कणकवली जलतरंग हॉटेल येथेच बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वा. ठाकरे खारेपाटणला रवाना होणार असल्याची माहिती उपरकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स