कलमठमध्ये 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाची सक्षमता वाढली.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्ष आता मजबुतीकरणाकडे वाटचाल करत आहे.
कलमठ सुतारवाड़ी मधील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षामधे प्रवेश केला आहे. तालुका प्रमुख भूषण परुळेकर व समन्वयक सुनील पारकर यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रवेश झाला.
तन्मय सावंत, प्रतिक बांदेकर, अनिकेत हडकर, प्रफुल्ल बाणे, निलेश हडकर, बाबू शिंदे, विनव सावंत, विकास राठोड, जन्नप्पा राठोड, संदेश गावडे, जयेश मोंडकर अशा कार्यकर्त्यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे.
आगामी निवडणुका व इतर राजकीय पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)