ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बांदा व इन्सूली येथील मंडळ कडे सायरन सुपूर्द..

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बांदा व इन्सूली येथील मंडळ कडे सायरन सुपूर्द..

प्रकाशन: 18 Sep 2021 11:54 AM
वाचन संख्या 75

राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाअध्यक्ष अमित सामंत यांची वचनपूर्ती

बांदा | राकेश परब : बांदा बाजारपेठ मध्ये तेरेखोल नदीचे पाणी येत असल्याने नागरिकांना आगाऊ सुचना देता यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा व इन्सुलीतील तीन सार्वजनिक मंडळांकडे सायरन (भोंगे) सुपूर्द करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडे सायरन देण्यात आले.
यावर्षी मुसळधार पावसामुळे बांदा, इन्सुली भागात तेरेखोल नदी पात्राचे पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. अशा वेळी पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे बांदा, इन्सुली भागातील ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालत, आपले जीव वाचवले होते. या घटनेनंतर अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा, इन्सुली भागातील लोकांसाठी ‘लाईफ जॅकेट’ पुरविण्यात आली होती. यावेळी बांदा, इन्सुलीत ग्रामस्थांना अलर्ट करण्यासाठी सायरन देण्याचा, तसेच आपत्कालीन किट देण्याचा शब्द अमित सामंत यांनी दिला होता. त्यानुसार काल पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते बांदा, इन्सुलीतील मंडळांकडे हे सायरन सुपुर्द करत सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
येथील साई भक्त मंडळ, कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ बांदा, इन्सुलीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाकडे हे सायरन देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अमित सामंत यांनी केलेल्या कार्याच जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कौतुक केले. यावेळी बांदा, इन्सुलीवासियांनी त्यांचे आभार मानले. तर गावासाठी केलेल्या मदतीबद्दल बांदा सरपंच अक्रम खान यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बांदा सरपंच अक्रम खान, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, जिल्हा उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, राष्ट्रवादी युवा नेते असलम खतिब, बांदा ग्रामस्थ राकेश केसरकर, प्रितम हरमलकर, साईराज साळगावकर, राजेश विरनोडकर, रवींद्र मालवणकर, सुशांत पांगम, सुनील धामापूरकर, इन्सुलीचे श्री. पेडणेकर, श्री. शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर, श्री. नाईक, अर्चना पांगम, दर्शना केसरकर, संजय पालव, चेतन वेंगुर्लेकर, संजय भाईप, राकेश परब आदींसह बांदा, इन्सुली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अमित सामंत यांनी पूरस्थितीमध्ये नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या. पूरस्थितीची माहिती मिळत नसल्याने बरीच वित्तहानी होते. ग्रामस्थांना पूराची माहिती वेळेत मिळाल्यास सावधानता बाळगून नुकसान कमी होण्यास मदत होईल. स्थानिकांच्या मागणीवरून सायरन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अन्वर खान तर आभार अक्रम खान यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स