ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
इंडियाका त्योहार…आय.पि.एल….!

इंडियाका त्योहार…आय.पि.एल….!

प्रकाशन: 18 Sep 2021 09:06 AM
वाचन संख्या 111

आपली सिंधुनगरी न्यूज | संपादकीय विशेष : http://localhost/news/public/uploads/2020 सालानंतर निसर्गाचे चक्र पुष्कळ विस्कळीत झाले. जगातील अनेक घटना, कार्यक्रम आणि भावनांनाच एक सावध कलाटणी मिळून गेली. त्याचदरम्यान लाॅकडाऊन या प्रकारामुळे प्रदूषणावरही आपसुक नियंत्रण येऊ लागले.
क्रिडा जगावरही याचे परिणाम होणे स्वाभाविकच होते आणि तसे झालेही.
क्रिडाजगतातील पर्यावरणही आता जपू जाऊ लागले.
टेनिस, फुटबॉल या प्रचंड महागड्या खेळांच्या आयोजकांनाही आता प्रेक्षक,खेळाडू आणि सामाजिक बांधिलकीलाही जपण्यावाचून पर्याय राहीला नाहीय.खेळाडूंकडे आता सामान्य माणसे म्हणूनच पाहिले जाते.त्यांच्याकडून यांत्रिकपणे स्पर्धेमागून स्पर्धा न खेळवता त्यांचातील माणसाचाही सावधपणे विचार होऊ लागलाय आणि सोबतच काही खेळाडुंच्या सामाजिक व फाजिल मनमानीलाही आळा बसू लागलाय हे विशेष…!
गेली चौदा वर्षे भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिडा सण म्हणून आय.पि.एल.स्पर्धा ओळखली जाते.
त्यापैकी पहिल्या तेरा वर्षांत हा सण अक्षरशः सत्तर सलग दिवस साजरा केली जाण्याची प्रथा होती. या सत्तर दिवसांत जवळपास सत्तर सामने आणि तितकीच खेळाडूंची प्रवासाची दगदग वगैरे गोष्टींसोबतच भर उन्हाळ्यात अनेक तंत्रज्ञ, सपोर्ट स्टाफ,समालोचक आणि सामने कव्हर करणारे प्रतिनिधी हेही सलगपणे आय.पि.एल.सणासाठी राबायचे. आर्थिक उलाढाल नक्कीच मोठी होती पण त्याचा अनेक खेळाडुंच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर आणि जीवन संयमावर ताबा सुटू लागला होता. स्ट्रेस घालवण्याच्या नादापोटी काही खेळाडू पार्ट्या, ड्रग्ज,मॅच फिक्सिंग वगैरेतही अडकले गेले. काहींची शारीरिक स्थिती ढासळली तर काहींनी पैशासाठी राष्ट्रीय संघांनाही रामराम केला.
पण आता चौदाव्या मोसमात निसर्गाने हाच सण दोन टप्प्यांत खेळवून ‘अती तिथे माती’ या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला.
यावर्षी आय.पि.एल.चा पहिला टप्पा भारतात खेळवला गेल्यानंतर तो कोरोनामुळे स्थगित करावा लागला.
एकापाठोपाठ एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर आय.पि.एल.गव्हर्निंग काऊन्सीलला खेळाडुंकडे माणुस आणि खेळाकडे निव्वळ व्यावसायिक मनोरंजन म्हणून बघणे क्रमप्राप्त झाले.
उद्यापासून आय.पि.एल.या सणाचा दुसरा टप्पा यु.ए.ई. व दुबईतील शारजात सुरु होतोय.
हा सण आता वर्षातून दोनदा तुकड्या तुकड्यात खेळवल्यामुळे क्रिकेटचा अतिरेकही टळलाय आणि इंडियाका त्योहार वर्षातून दोनदा साजरा करायची एक संधी मिळालीय.
खरंच…..सर्व प्रकारच्या खेळांपेक्षा सर्वात दीर्घ समय मैदानावर राबावे लागणार्या या खेळासंबंधी सर्वांचेच निसर्गचक्र बदलले गेलंय.
आय.पि.एल.च्या दुसर्या टप्प्यांत मेहनत,शिस्त आणि क्रिकेटची एक वेगळी उंची पहायला मिळेल यांत शंकाच नाही.

संपादकीय(आपली सिंधुनगरी चॅनेल)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स