बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ रस्त्याचे काम त्वरित सुरू करा.
अन्यथा आंदोलन ; विरोधी गटनेता सुशांत नाईक यांचा इशारा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
शहरातील बिजलीनगर प्रहार ऑफिस ते मराठा मंडळ हा हॉटमिक्स रस्ता मंजूर होऊन 6 महिने उलटून गेलेत.मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. येत्या 8 दिवसांत या रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या प्रभागाचे नगरसेवक तथा विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ह रस्ता सध्या पूर्ण खड्डेमय झाला असून रस्त्याच्या नूतनीकरण साठी 18 लाखांचा निधीही मंजूर आहे.स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही.येत्या 8 दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)