शिरवलमधून अनेकजणांचा भाजपात प्रवेश.
आमदार नितेश राणे यांनी केले विशेष स्वागत.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिरवल चव्हाणवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे राजेंद्र शांताराम चव्हाण (चर्मकार समाज माजी तालुका अध्यक्ष व सल्लागार) यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला .
गेले काही दिवस जेवढ्या तीव्रतेने भाजपामध्ये इनकमिंग सुरू आहे ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के देणारा आहे असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व प्रगतीच्या कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी आम. नितेश राणे यांच्यासह महेश शिरवलकर सरपंच, पंढरी शिरवलकर, राजन सावंत, सुचित गुरव, विलास मेस्त्री, ज्ञानेश्वर शिरसाट, नामदेव जाधव (भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) रुपेश चव्हाण उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)